• Weekly Meeting on every Thursday @ 7:15 P.M
  • Ganesh Nagar, Sangli

Rotary Information

 

आपला सध्याचा प्रांत, म्हणजे district 3170 1984 पासून आताच्या स्वरूपात तयार झाला आहे.

 

दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक व संपूर्ण गोवा राज्याचा यात अंतर्भाव होतो.

 

महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे चार जिल्हे, कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, विजयपूर, बागलकोट, हावेरी, गदग, कारवार हे सात जिल्हे व संपूर्ण गोवा राज्य यांचा प्रांत 3170 मध्ये समावेश केला गेला आहे.

 

उत्तरेकडील टोक खेड क्लब, दक्षिणेकडील टोक भटकळ क्लब आणि पूर्वकडील टोक तालिकोट क्लब म्हणता येईल.

 

रोटरी डिस्ट्रिक्ट चे काम रेव्हेन्यू डिस्ट्रिक्टच्या मधून केले जाते.

 

त्यामुळे महाराष्ट्रातील चार जिल्ह्यामधून सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे चार रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट तयार होतात.

 

सांगली रेव्हेन्यू डिस्ट्रिक्टमध्ये शहरी भागात सांगली, सांगली मिडटाऊन, सांगली सिटी, कृष्णा व्हॅली व मिरज असे पाच व ग्रामीण भागात तासगाव व विटा सिटी असे दोन क्लब आहेत.

 

सर्व मेंबर्सना अशी विनंती राहील की त्यांनी या सर्व क्लबच्या मीटिंगना वर्षात एकदा तरी भेट द्यायचा प्रयत्न जरूर करावा.

 

मित्रांनो, रोटरी हे नाव कसं पडलं? 1905 मध्ये या संकल्पनेची सुरुवात करणाऱ्या सदस्यांकडे आलटून पालटून मीटिंग्ज होत असत. त्यामुळे रोटेटिंग किंवा फिरत्या मीटिंग यावरून रोटरी हे नाव देण्यात आलं.

 

आता थोडी रोटरीची थक्क करणारी आकडेवारी!
जगभरातल्या 200 देशांमध्ये रोटरी क्लब्ज आहेत. रोटरी जगताला 34 झोन मध्ये विभागले गेले आहे. यामध्ये एकूण 520 डिस्ट्रिक्टस, त्यात 36 हजार रोटरी क्लब्ज, दहा हजार रोटरॅक्ट क्लब्ज आणि एकूण 14 लाख रोटेरियन्स आहेत.

 

भारतामध्ये पाच झोन आहेत, 4A, 4B, 5A, 5B, आणि 6A, यामध्ये एकूण 36 डिस्ट्रिक्टस आहेत आपल्या डिस्ट्रिक्ट चा झोन आहे 5B आणि त्यात डिस्ट्रिक्ट आहेत सात.